भुसावळ – दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेषला एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे अनुक्रमे दि. १८.५.२०२३ आणि २०.५.२०२३ पासून वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

ट्रेन क्रमांक 02101/02102 आणि ट्रेन क्रमांक 01065/01066 साठी सुधारित संरचना:
एक वातानुकूलित चेअर कार, १ शयनयान , ८ द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन सह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.
संवर्धित शयनयान कोचसाठी बुकिंग दि. १७.५.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल आणि अतिरिक्त ३ सामान्य द्वितीय श्रेणी अनारक्षित कोच म्हणून चालतील आणि UTS द्वारे बुक केले जाऊ शकतात.
प्रवाशांना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.


