भुसावळ -अप्रगत राष्ट्रांच्या सशक्तीकरणासाठी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम तंत्रज्ञान” ह्या बोधवाक्याला अनुसरून जगभर जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात आला भुसावळ श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन शाखेच्या वतीने सुद्धा जागतिक दूरसंचार दिन १७ मे रोजी साजरा केला गेला.
ह्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील बदल, रोजगार आणि संधी ह्याचा आढावा घेतला गेला व विद्यार्थी आणि विद्यार्थिंनिना इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातील अफाट संधींची माहिती अवगत करून दिली गेली.
ह्या दरम्यान बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम तंत्रज्ञान ही केवळ सशक्त संवादाचेच माध्यम नसून ह्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगार, व्यवसाय आणि संशोधनाच्या संधी ह्या कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक सशक्तीकरणासाठी सहायभूत ठरतील आणि म्हणूनच यूनायटेड नेशन्स ने सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम तंत्रज्ञानाला अप्रगत राष्ट्रांच्या आर्थिक आणि औद्योगिक सशक्तीकरणासाठी केंद्रस्थानी ठेवल्याचे सांगितले.
ह्या संवादादरम्यान कार्यक्रमादरम्यान विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनीअरिंग क्षेत्र आता कात ताकत असून भारतात ह्या क्षेत्रात अपरिमित संधि उपलब्ध होतील. मुले तसेच मुलींनी ह्या क्षेत्राकडे अधिकाधिक वळण्याची गरज असल्याचे सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनीअरिंगचा लवचिक अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्स विषयांबरोबरीनेच आंतरशाखीय विभागांमध्ये रोजगार मिळण्याची संधी निर्माण करून देतो व फाइव-जी तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयीचे नवीन राष्ट्रीय धोरण यांमुळे अनेक संधी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रात उपलब्ध होतील असे सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनीअरिंग क्षेत्रातील संधी आणि ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अंगी बाणणारी बहुमुखी प्रतिभा आणि कौशल्य ह्या मुळे विद्यार्थिंनी कोअर इलेक्ट्रॉनिक्स बरोबरीनेच सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रातही काम करू शकत असल्याचे मत विद्यार्थिंनी विकास आणि सशक्तीकरण विभागाच्या प्रमुख प्रा. सौ. सुलभा शिंदे व समन्वयक डॉ. नीता नेमाडे यांनी मांडले. कार्यक्रमाला प्रा. अनंत भिडे, प्रा. डि. जी. अग्रवाल, प्रा. एस. एम. शिंदे, डॉ. नीता नेमाडे व प्रा. जी. यू. पाटील, नितीन पांगळे व विजय विसपुते उपस्थित होते.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड, यांनी शुभेच्छा दिल्या.



