;

भुसावळ – येथील महिला पतंजली योग समिती व जायंट्स वसुंधरा प्रेरणा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तथा युनिट डायरेक्टर महानदा पाटील लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या आरोग्याची काळजी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ वृषाली चौधरी यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी यावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले
प्रसंगी भुसावळ मधील सर्व योग वर्ग एकत्रित करून महिला व मुलींसाठी कार्यक्रम घेण्यात आला आपल्या दिनचर्येत काय बदल करावे आज काल वाढते कॅन्सरचे प्रमाण व महिलांचे p c od चे प्रमाण व इतर आजार यावर खूप सुंदर मार्गदर्शन केले .
प्रसंगी महिलांनीं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला . नंतर पुदिना सरबत देऊन कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रमास वसुंधरा , प्रेरणा व पतंजली ग्रुपचे मंदाकिनी केदारे मीना रजपूत राजश्री बादशहा वर्षा लोखंडे अंजली वाघमारे जोस्ना कुलकर्णी दिपाली अहिरे व सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .तसेच एव्हरग्रीन बचत गटाच्या अध्यक्ष शालिनी वाढेकर तेरापंथ भवनचे अध्यक्ष पूनम साखला , योग वर्गा मधील साधक हेमलता चौधरी, रुपाली पाटणकर, तेजस्विनी प्रजापती ,प्रीती महाले, प्रतिभा पाटील, ,प्रणिता देशपांडे, सुरेखा पाटील, शिरसाठ ताई आरती खांडवेकर ,मनीषा चौधरी, नेहा चौधरी, सुरेखा नेमाडे ,रश्मी निमाने गौरी ,लोखंडे दिपाली ,राणे आदी महिला उपस्थित होत्या


