भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे किल्ला माझ्या शिवबाचा ” स्पर्धेचे आयोजन :

!भुसावळ – ! शिवबाचे आठवावे रुप-शिवबाचा आठवावा प्रताप !!हिंदु ह्रदय सम्राट,जाणता राजा , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे या कल्याणकारी रयतेच्या राजाच्या आदर्श आणि एकूण सर्वागीण सर्वाच्या विकास साधणारी विचारसरणी आणि मार्गदर्शक तत्वे यांचा प्रचार ,प्रसार,आणि अंगिकार व्हावा यासाठी, ” शिवराज्याभिषेक दिन- ३५० पूर्ती सोहळा”
दि ६ जून २०२३ रोजी स्टारलॉन येथे आयोजीत करीत आहोत.
शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीसह ते बळकट करण्यासाठी त्यांच्याजवळ ३५० किल्ले होते. त्यापैकी एक किल्ला प्रतिक्रुती बनवून “किल्ला माझ्या शिवबाचा “ या स्पर्धेचे आयोोजन करण्यात आले आहेे .

बक्षिसे:

१) पहिले बक्षिस – ५००१
२)दुसरे बक्षिस – ३००१
३) तिसरे बक्षिस- २१०१
४) ३ उत्तेजनार्थ बक्षिसे -११०१

पारितोषिक वितरण ६ जुन ला आमदार यांचे हस्ते होइल.

नियम:

१) वयाची अट नाही
२) किल्ला जास्तीत जास्त टाकाऊ पदार्थ वापरुन करावा.
३ )किल्ला फार मोठा किंवा फार लहान असू नये.
४) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
परीक्षक घरी येउन परीक्षण करतील.
५) २ जून २०२३ पर्यंत किल्ला पूर्ण करावा. अंतिम तारिख : २/०६/२०२३
६) नाव नोंदणी आवश्यक

संपर्क क्रमांक
राजश्री देशमुख
8888389793
राजश्री बादशाह
8600783976