भुसावळ : शहरात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून शहराचा विविध कारणांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर अर्धा मे महिना संपल्यानंतरही तो सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. शहरातील सर्वच भागात १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने रणरणत्या उन्हात जनतेची पाण्यासाठी भटकंती येत आहे. शहराला लागून असलेल्या मात्र नगरपालिकेत समाविष्ट नसलेल्या आरएमएस कॉलनी भागात तर पाण्याची बेपर्वाईने नासाडी होत असताना दुसरीकडे याच भागातील काही भाग पाण्यासाठी आसूसला आहे.

नागरीकांना दररोज पाण्याचे टँकर मागवण्याची वेळ आली आहे. पालिका प्रशासनाने या भागातील पाण्याची नासाडी थांबवून नागरीकांना दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यातच या भागात आमदार संजय सावकारे यांनी भेट देवून रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. तर अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा झाला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले व पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे
नवीन RMS कॉलनीत पाण्यासाठी लोक ओरडत आहे आमदार नुसते हो मी करतो असं गाजर दाखवतात मात्र कृती शून्य असे येथील नागरिक ओरड करीत आहे याउलट शिवपूर कन्हाळा रोडला मात्र पाण्याची नासाडी होवून पाणी वाहत आहे
नारायण नगर मध्ये नगरसेवक पण त्याच्या मार्जितल्या लोकांना पाणी देतात आम्हा ला का देत नाही असं विचारलं तर तुम्हाला पाणी द्यायला मालकाने नाही सांगतलं असं टँकर चा चालक उत्तर देतो
त्यामुळे RMS कॉलनी च्या व लोकांना नारायण नगरच्या लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते
रेल्वे अधिकार्यांसोबत सर्वे होणार
गडकरी नगरासाठी शहरात अंथरण्यात आलेल्या अमृत योजनेतील पाईप लाईन वापरात घेण्यात आली मात्रव् बसस्थानक भागासह फालक नगरात गळती लागल्याने योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. आता पालिका प्रशासन मंगळवारी वा बुधवारी रेल्वे अधिकार्यांसोबत बसस्थानक भागाचा सर्वे करणार असून त्यानंतर लिकेज दुरुस्ती केली जाईल, असे पाणीपुरवठा अभियंता देशमुख म्हणाले.
शहराला लागून तापी नदी वाहते मात्र असे असतानाही महिन्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. अनेक भागात पंधरा दिवस उलटूनही पाणी येत नसल्याने नागरीक वर्गणी करून महागडा पाण्याच टँकर मागवत आहे. अमृत योजना असलीतरी प्रत्यक्षात ती कार्यान्वीत कधी होणार? याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही.
लवकरच होणार पाणीपुरवठा सुरळीत
विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसात पाणीपुरवठा विस्कळीत झाला मात्र आता लवकरच शहराचा पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी सांगितले.


