जायन्ट्स प्रेरणा सहेली ग्रुपतर्फे मातृदिन साजरा : स्तुत्य उपक्रम :


भुसावळ –
14 मे रविवार रोजी जागतिक मातृदिना निमित्त जायन्ट्स प्रेरणा सहेली ग्रुपतर्फे मोोठ्या उत्साहााने मातृदिन साजरा करण्यात आला .
येथील एका गरीब मोलमजूरी करणाऱ्या एका मातेने चार दिवसा पूर्वीच एका बाळाला जन्म दिला मदर्स डे चे औचित्य साधून या आईला सुका मेवा , साडी ,बाळाला ड्रेस देण्यात आला. प्रसंगी प्रोजेक्ट प्रमुख मीना राजपूत व प्रेरणा ग्रुपच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष सुरेखा तायडे यांनी परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाला महानंदा पाटिल तर वसुंधरा ग्रुपच्या माजी अध्यक्ष राजश्री बादशहा ,नूतन अध्यक्ष मंदाकिनी केदारे , व सर्व सन्माननिय सदस्य उपस्थित होते तसेच प्रेरणा ग्रुप च्या उपाध्यक्ष सुरेखा तायडे व सचिव मोनाली लोणारी उपस्थित होते .