लाखो रुपयांचा परस्पर अपहार करणारे तिघे जेरबंद ! –

भुसावळ – व्हॅटअँपवर बनावटी व छेडछाड केलेले व्यवहाराचे स्क्रीनशॉट कंपनीला सादर करून लाखो रुपयांचा परस्पर अपहार करणारे तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

रोडीओ ट्रॅव्हल्स टेक्नॉलाजीज प्रा.लि.कंपनी ट्रेन मध्ये अन्न वितरण करते आणि वितरणासाठी (आय.आर.सी.टी.सी.)ची अधिकृत भागीदार आहे. कंपनीने (Railofy) नावाने अँप विकसित केला आहे. ज्याव्दारे ट्रेन मध्ये प्रवास करणारे प्रवाशी जेवणाची ऑर्डर देवू शकतात.यासाठी ऑर्डर कॅशऑन करून जमा झालेली रोख रक्कम दिवसांच्या शेवटी (यु.पी.आय) व्यवहाराव्दारे कंपनीच्या खात्यात हस्तांतरित करून व्यवहारांची पावती व्हॅटअँप व टेलिग्रामवर रेकॉड साठी पाठवण्यासाठी कंपनीने भुसावळ व जळगांव येथील तिघांची डिलिव्हरी बॉईज म्हणून नियुक्ती केली आहे.या तिघांनी व्हॅटअँपवर बनावटी व छेडछाड केलेले व्यवहाराचे स्क्रीनशॉट कंपनीला सादर करून लाखो रुपयांचा परस्पर अपहार करणारे तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

याप्रकरणी रोडीओ ट्रॅव्हल्स टेक्नॉलाजीज प्रा.लि.कंपनीने ट्रेन मध्ये अन्न वितरण करणे कामी जॉब पोर्टल वर जॉब पेस्टींगव्दारे किंवा संदर्भाव्दारे अनेक रेल्वे स्थानकावर डिलिव्हरी बाईज नियुक्त केले आहे.जे कंपनीला ऑर्डर मिळाल्यावर प्रवाशांना जेवण पोहचवितात.

सदरील इसम मयूर महेंद्र मगर राहणार आंबेडकर नगर यांची नियुक्ती ५ ऑगेस्ट २०२२ तर रोहित गजानन बडगे राहणार हुडको कॉलनी,पिंप्राळा जळगांव, यांची नियुक्ती ४ जून २०२२ रोजी तसेच शुभम दिपक बाविस्कर राहणार आंबेडकर नगर भुसावळ यांची नियुक्ती ५ ऑगेस्ट २०२२ रोजी या तिघांनी रोडीओ ट्रॅव्हल्स टेक्नॉलाजीज प्रा.लि.कंपनीने भुसावळ रेल्वे स्थानकावर नियुक्ती करण्यात आली होती.

तिघेही भुसावळ स्टेशनवर जेवण पोहचवायचे आणि कॅश ऑन डिलिव्हरीच्या ऑर्डर गोळा करायचे व दिवसांच्या शेवटी कंपनी कडे रोख रक्कम जमा करणे आवश्यक आहे आणि (यु.पी.आय) व्यवहाराचा स्क्रीनशॉट कंपनीच्या व्हॉटअँप ग्रुप मध्ये शेअर करणे आवश्यक आहे.कंपनीने स्टेशन निहाय ग्रुप तयार केलेले आहे.स्टेशन डिलिव्हरी बॉय स्टेशन मॅनेजर, प्रादेशिक प्रमुख,अकाऊंट टीमचे तीन सदस्थ प्रत्येक ग्रुपचे सदस्थ आहेत.एप्रिल २०२३ मध्ये कंपनीने खाते तपासले असता सप्टेंबर २०२२ पासून खाते ऑर्डरशी आणि त्यानंतर मिळणारे पैसे जुळत नाही. त्यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले.कंपनीने चौकशी केली असता असे समजले की डिलिव्हरी बॉय नामे

मयूर महेंद्र मगर,रोहित गजानन बडगे,शुभम दिपक बाविस्कर हे तिघे प्रवाशांकडून रक्कम गोळा करण्याचा अधिकार कंपनीने विश्वासाने संशयित आरोपिकडे स्वीकारण्याचा अधिकारी दिले असता ते पैसे संशयित आरोपींनी कंपनी कडे न भरता आरोपितांना त्यांचा परस्पर अपहार करून स्वतःचे मोबाईल वरील फोन पे अँप वर दिसणाऱ्या पावतीवर या मोबाईल क्रमांका वरून (मयूर ८६६८८५०९१७)(रोहित ८३२९३००७९३)(शुभम ९७६४३०४०४१) यांनी बनावट व छेडछाड केलेले व्यवहाराचे स्क्रीनशॉट कंपनीत सादर करून कंपनीची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. कंपनीच्या खात्यात पडताळणी केली आसता मयूर ६९,५०० रोहित २,९०,५०० तर शुभम २,३४,१०० असे रक्कमेची स्क्रीनशॉट कंपनीचे अँप वर पाठवून पैसे भरणा केल्याचे खोटे दर्शविले आहे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून मुद्रुत जितेंद्र गुप्ता राहणार मसुरीया जोधपूर राज्य राजस्थान हल्ली मु.पो.३०१ अविस्मरनिय अपार्टमेंट कमाल टॉकीज रोड,वैशाली नगर,नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला (ता.८) मे रोजी रात्री १.३० वाजेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपींना मंगळवार ९ मे रोजी रात्री अटक केली.१३ मे पर्यत पोलीस कोठडी सुनविली आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे सह प्रशांत लाड करीत आहे.