नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेने केला कामगार व हमाल बांधवांचा सन्मान : रुमाल वाटप करुन दिली सावली :

जळगाव – १मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगावतर्फे दिनांक 1 मे रोजी हनुमान मंदिर दाणा बाजार येथे हमाल बांधवांना रुमाल वाटप करण्यात आले.
दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणारे हमाल व , वाढते तापमानात पोटापाण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे हमाल वा कामगार कसलीच पर्वा न करता अहोरात्र श्रमदेवतेची उपासना करतात. म्हणून कामगार दिनाचे व उन्हाळ्याचे औचित्य साधून त्यांना रुमालाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व विषद केले.या कार्यक्रमासाठी विद्याताई जकातदार, वंदनाताई मंडावरे यांचे आर्थिक सहाय्य लाभले. यावेळी दाणा बाजार कामगार सेना अध्यक्ष शेषराव वलकर ,सौ मनिषा पाटील,सौ.विद्या जकातदार,वंदना मंडावरे,
सौ माधुरी शिंपी,
सौ.भाग्यश्री महाजन,
मरियम बुगडवला,
सौ. आशा मौर्य,सौ हर्षा गुजराती,रेणुका हिंगु,
सौ.निता विसावे व सर्व हमाल बांधव
उपस्थित होते .