संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 संपन्न

भुसावळ -येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 ह्या नावाने वार्षिक स्नेह्सम्मेलनाला उत्साहात सुरुवात झाली असून शनिवारी महाविद्यलयात विजोड वेशभूषा (मिसमॅच डे) दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेतून विविध वेशभूषा परिधान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.

प्राचार्य डॉ. आर. बी. बारजिभे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डि. जी. अग्रवाल, डॉ.गिरीश कुलकर्णी , प्रा. ए. व्ही. पाटिल, डॉ.एस. बी. ओझा, डॉ. पंकज भंगाळे, डॉ. अजित चौधरी, डॉ. डि. डि. पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. प्रिती सुब्रमण्यम, डॉ. जे. आर. चौधरी व प्रा. जी. पी. टेंभुर्णीकर यांनी काम पाहिले. हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.