भुसावळ – राजमाता माॅ साहेब मराठा महीला मंडळ सकल मराठा समाज भुसावळ यांच्याकडून रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही भव्य रांगोळी स्पर्धा तालुकास्तरीय असुन सर्वांसाठी खुली आहे. दिनांक 17 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 9.30 वाजता संतोषी हाॅल मातृभुमी चौक भुसावळ येथे होईल. या रांगोळी स्पर्धेचा विषय आप आपल्या कल्पने प्रमाणे रांगोळी कलाकृती हा असणार आहे, यात विजेत्या स्पर्धकांना पहीले,दुसरे,तिसरे व दोन उत्तेजनार्थ बक्षीस दिले जातील. यात सन्मान चिन्ह प्रमाणपत्र, माँसाहेबांचा फोटो व पैठणी,सेमी पैठणी असे बक्षिसे असतील .तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धा झाल्यानंतर लगेचच पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात येईल. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकानीं सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे



