छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तालुकास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धा :


भुसावळ – राजमाता मासाहेब मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाज भुसावळ यांच्याकडून रांगोळी स्पर्धेचे आयोजन
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमाता मासाहेब मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाज भुसावळ तालुका यांच्या वतीने भव्य तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा दिनांक 17 फेब्रुवारी शुक्रवार रोजी घेण्याचे नियोजन मराठा समाज बैठकीत करण्यात आले सदर बैठक मराठा समाज तालुका अध्यक्ष रवी दादा ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या भव्य रांगोळी स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी ॲड. जास्वंदी भंडारे (पाटील) व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारली सदर बैठकीस श्री वसंत पाटील, श्री रंजन शिंदे, श्री कन्हैया पाटील ,संजय, ठाकरे,ॲड.जास्वंदी भंडारे, सौ ललिता पाटील, अलका भगत, वैष्णवी धोटे, भारती पाटील ,ममता पाटील, छाया धोटे उपस्थित होते
ही भव्य रांगोळी स्पर्धा तालुकास्तरीय असून सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धा दिनांक 17 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी ९.३०वाजता संतोषी माता हॉल मातृभूमी चौक भुसावळ येथे होईल या रांगोळी स्पर्धेचा विषय “शिवकालीन ऐतिहासिक रांगोळी” हा असणार आहे यात गड, किल्ले ,महाराज मॉ जिजाऊ, मावळे ,सरदार असे विषयाशी संबंधित रांगोळ्या असाव्यात ‌. यात विजेत्या स्पर्धकांना पहिले, दुसरे, तिसरे व दोन उत्तेजनार्थ बक्षीस दिले जातील यात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र मासाहेबांचा फोटो व पैठणी,सेमी पैठणी असे बक्षिसे असतील पुरुष स्पर्धक असतील तर आकर्षक बक्षिस देण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल
स्पर्धेचे नियम व सुचना….
*१८वर्षावरील महिला, मुलीं, पुरुषांना रांगोळी स्पर्धेत सहभागी होता येईल
*स्पर्धकांनी रांगोळी स्वतः आणावी
*रांगोळी काढण्यासाठी रांगोळीच्या रंगांचा वापर करावा
*रांगोळी काढण्यासाठी साठी 4 *4चा चौकोन आखुन देण्यात येईल.
*रांगोळी काढण्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल
*रांगोळी विषयाला अनुसरून असावी
*स्पर्धकांनी वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी पोहचावे
*परिक्षकांचा निर्णय अंतीम असेल
*स्पर्धेच्या ठिकाणीच स्पर्धा झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल
*स्पर्धकांसाठी नाश्त्याची व्यवस्था असेल
स्पर्धेच्या नावनोंदणी ॲड.जास्वंदी भंडारे (पाटील)
ललीता पाटील
वैश्नवी धोटे
महानंदा पाटील
यांचेकडे भ्रमणध्वनी द्वारा करावी
मो.नं 8624878299
मो.नं.8788074517
मो.नं. 8956330379
मो.नं 9756330379