भुसावळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांची पाच वर्षांसाठी अर्थशात्र, अभ्यास मंडळावर नियुक्ती केली आहे. अभ्यासक्रम ठरविणे, परीक्षा पद्धती याबाबत आवश्यक निर्णय अभ्यास मंडळाद्वारे घेतले जातात. डॉ.रमेश जोशी यांच्या निवडीबद्दल हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवीकांत परदेशी, सचिव मधुलता शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयले, सभापती रमेश नागराणी व महाविद्यालयाचे डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, डॉ.पूनम त्रिवेदी, प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



