संविधानाच्या ताकदीमुळे देश आजही अखंडपणे एक शक्तीने उभा – आमदार संजय सावकारे –

भुसावळ – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या हस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत सादर केले.भुसावळकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना आमदार संजय सावकारे म्हणाले की,आजच्या दिवशी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले आहे.लोकशाहीची कुंपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सुंदर केली आहे.कोणी कोणावर कुरघोडी करू शकत नाही.अशी रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.लोकशाही पण जिवंत आहे. न्यायव्यवस्था आहे. शासन, वृत्तपत्रे आहेत या सर्व गोष्टीचा समतोल ठेवून उत्कृष्ट राज्यघटना तयार केली आहे. ती आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित केली आहे. आपला देश त्या संविधानाच्या माध्यमातून उत्कृष्ट चालला आहे.त्या संविधानाचीच ताकद आहे की, देशाच्या पुढे इतकी संकटे येतात.पण संविधानामुळे देश आजही अखंडपणे एक शक्तीने उभा आहे असे आमदार संजय सावकार यांनी म्हटले.यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक ढिवरे, मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.