ZRTI मध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन संपन्न


भुसावल – रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेना खासदार विनायक राऊत,केंद्रीय सरचिटणीस दीवाकर देव यांच्या मार्गदर्शनाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रेल कामगार सेना भुसावळच्या सौजन्याने ZRTI मध्ये प्रथमच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य सतीश जैन यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळेस APO-विनय जोशी,ADME-G.R.अय्यर,ADEE-विनय पगारे,ACM-झा,रेल कामगार सेनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी,मुंबई मंडळ सचिव आशुतोष शुक्ला,भुसावल मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा,मंडल कार्याध्यक्ष प्रीतम टाक,उपाध्यक्ष अरविंद थोरात,सहसचिव पंकज़ ठाकरे,M K शहा,सिविल डिफेन्स निरिक्षक C. B.लूईस व इतर कामगार व प्रशिक्षनार्थी उपस्थित होते.