भुसावळात हिरकणी महोत्सव 2023 व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळात हिरकणी महोत्सव 2023 व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा :
भुसावळ – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच आयोजित हिरकणी महोत्सव 2023 तसेच
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी व्यासपीठावर
जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या सौ दिपाली सुरवाडे ,आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे डॉ. मधु मानवतकर
प्रा. शुभांगी राठी,धनश्री जोशी व सक्षम कौन्सिलिंग सेंटरच्या आरती चौधरी आणि
साईजीवनच्या संचालिका सौ
कविता कोठारी या उपस्थित होत्या याप्रसंगी नुपूर कथक अकॅडमीच्या कु. नुपूर हिने
श्री गणेश वंदनेवर सुंदर नृत्य सादर करून हिरकणी महोत्सवाची सुरुवात केली. यावेळी भारत मातेचे प्रतिमा पूजन करून जनगणमन म्हणत प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर वंदना वाघचौरे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन हिरकणी महिला मंच आयोजित हिरकणी महोत्सवाचे प्रास्तावना मांडली, यावेळी सौ दिपाली सुरवाडे यांनी उपस्थित महिला उद्योजकांना उद्योग करीत असताना येणाऱ्या अडचणीवर कशी मात करावी तसेच कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना मदत मिळू शकते व सहकार्य केले जाऊ शकते, यासाठी मार्गदर्शन केले त्यानंतर डॉ. मधु मानवतकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी व चाळीशी नंतर येणारे प्रॉब्लेम यावर मार्गदर्शन केले, यावेळी प्रा.शुभांगी राठी यांनी महिलांना हळदी कुंकवाचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर पारंपारिक वेशभूषा स्पर्धा व गीत गायन स्पर्धा तसेच स्टँड अप कॉमेडी कॉम्पिटिशन घेण्यात आल्या. यासाठी धनश्री जोशी यांनी परीक्षण केले.महोत्सवात मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांनी जळगाव व भुसावळ परिसरातील वेगवेगळ्या भागातून उस्फुर्त पणे हजेरी लावली होती
त्यांनी त्यांच्या बचत गटांचे माध्यमातून महिला मंडळांचे प्रदर्शनाचे विक्री स्टॉल लावलेले होते मनमोहक स्टॉलवर महिलांची उपस्थिती पाहण्याजोगी होती. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात हा महोत्सव साजरा केला गेला. विविध स्पर्धा व रंगारंग कार्यक्रमां सोबतच उखाणा स्पर्धा व लकी ड्रॉ काढण्यात आले आणि महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच हळदीकुंकवाच्या वाण म्हणून जळगाव येथील उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या मुलांनी स्वतःचे बनवलेल्या वस्तू या ठिकाणी वाण म्हणून वाटण्यात आल्या. आणि यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र
व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये प्रथम क्रमांक आरती पवार द्वितीय स्वप्नाली घोडके व तृतीय क्रमांक रेखा आव्हाड यांनी पटकावला .
तसेच गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वंदना जोशी नीता चौधरी व तृतीय क्रमांक डॉ.स्वप्नजा तायडे यांना देण्यात आला. त्याच पद्धतीने सौ संगीता बोलके यांनी स्टँड अप कॉमेडी प्रथम पारितोषिक पटकावले .यावेळी उपस्थित उद्योजिकांमधून उद्योग करतांना.. स्टॉलच्या प्रदर्शनातील
बेस्ट परफॉर्मन्स-
बेस्ट प्रेसेंटेशन आणि
बेस्ट प्रोन्सेशन या गोष्टींना महत्त्व देवून
उत्कृष्ट उद्योजिका पारितोषिक
देण्यात आले त्यात भुसावळ येथील कु प्रियंका गडे हिने टाकाऊ कापडापासून हॅन्डमेड ज्वेलरी साठी प्रथम पारितोषिक मिळवले ,तर द्वितीय क्रमांकाची उद्योजिका म्हणून जळगाव शिरसोली येथील कुलस्वामिनी महिला बचत गट जळगाव शिरसोली यांनी खापर पुरणपोळी साठी द्वितीय पारितोषिक पटकावले त्याच पद्धतीने कु. रचना रमेश महाजन यांना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सलग तीस तास 13 ×10 ची रांगोळी काढण्याचा रेकॉर्ड केल्यासाठी सक्षम नारी फाउंडेशन व आर्या फाउंडेशनच्या वतीने प्रोत्साहन पर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड देण्यात आला .यावेळी आरती चौधरी यांनी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मेडिकलची काही बुक्स अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली ,
या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गाडेकर अध्ययन पॅरामेडिकलच्या प्राचार्य
मनीषा बाविस्कर व उर्वशी गोसावी यांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने केले यावेळी सक्षम नारी फाउंडेशनचे पदाधिकारी सेक्रेटरी पल्लवी अंबाडी ,शितल भालेराव, संगीता जगताप, तसेच महिला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व शहरातील विविध महिला मंडळाच्या महिला तसेच महिला शक्ती मंडळ अध्यक्ष अंजुम खान ,निरंजना साळवे यांची यांची उपस्थिती होती ,आणि शेवटी डॉ. वंदना वाघचौरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी महिला मंचच्या सदस्य
आशाताई पाटील ,मनीषा बराटे कल्पना सोनवणे,अश्विनी कासार, सुरेखा वाघमारे
रेण शर्मा ,
वैशाली कोळी ,संगीता बोलके तसेच प्रजावती तायडे, कविता जाधव ,सुनीता बागुल सायली साळवे, ऐश्वर्या सुरवाडे अश्विनी निकम ,प्रियंका लोणारी,रीना पारधी, मीनल भालेराव, तौसिफ, नकुल,शाहिद ,अक्षय यांनी परिश्रम घेतले.