भुसावळ:- शहरातील साकेगाव येथे महामार्ग लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सीसी आयोजित एस पी एल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना जय महाराष्ट्र व एम्पायर मल्हार संघात झाला एम्पायर मल्हार ने सामना ८ गडी राखत जिंकला स्पर्धेत. स्पर्धेत१६१ धावा काढणाऱ्या मोसिन पटेल यास “मॅन ऑफ द सिरीज” तसेच बेस्ट बॅट्समन व अश्फाक पटेल याने अंतिम सामन्यात हॅट्रिकसह ६ गडी व स्पर्धेत ९ गडी बाद केले त्यास “मॅन ऑफ द मॅच” तसेच बेस्ट बॉलर चा पुरस्काराने त्यास सन्मानित करण्यात आले. विजेता व उपविजेता संघाला गावातील सर्वपक्षीय पुढारी, प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रा.पं. सदस्य संघमालक, खेळाडू व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रोख बक्षीस तसेच आकर्षक चषक देण्यात आले.

गेल्या चार दिवसापासून क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देशातील विविध शहरात गेलेले ग्रामस्थ यांनी सुटी टाकून स्पर्धेचा आनंद घेतला. याशिवाय स्पर्धेतील सामने येथे थेट प्रक्षेपण असल्याने अनेकांनी हे मनसोक्त आनंद लुटला. रविवारी सुट्टी असल्याने अंतिम सामना पाण्यासाठी मैदानाच्या मैदानावर तसेच महामार्ग सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात क्रिकेट रसिकांनी गर्दी केली होती.
अंतिम सामना जय महाराष्ट्र व एम्पायर मल्हार संघात खेळला गेला जय महाराष्ट्र ने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकात ५१ धावा केल्या प्रत्युत्तरात एम्पायर मल्हार ने निर्धारित लक्ष अवघ्या ५ षटकात ८गडी राखून पूर्ण केले व एस पी एल क्रिकेट स्पर्धेवर नाव कोरले.
सोलापूरचा अंपायर स्पर्धेचा आकर्षण
एम्पायर मल्हार संघाचे संघ मालक राहुल चौधरी यांनी क्रिकेट रसिकांना मनोरंजन व्हावे याकरिता सोलापूर येथील आपल्या विशिष्ट शैलीने अंपायरिंग करणाऱ्या सोनू भोसले यांना बोलाविले होते भोसले यांनी त्यांच्या विशिष्ट शैलीने रसिकांचे मने जिंकले.
दरम्यान उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनातर्फे आयोजन कमिटीचे शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी राहुल चौधरी, डॉ. दीपक पाटील, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, नितीन पाटील, प्रवीण पाटील, डॉ. कैलास ठाकरे, रमजान पटेल, अजय चौधरी, भूषणसिंग राजपूत, राहुल साळुंखे, पप्पू पटेल, हेमंत वाघ, सचिन सोनवणे, मोहित यांच्यासह मॉर्निंग सी.सी.चे खेळाडू ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
पंच म्हणून भुरु भाई, मुन्नाभाई, गुणलेखन म्हणून निलेश कोळी, समालोचक म्हणून रमजान पटेल, बाळासाहेब पाटील यांनी काम बघितले.


