वरणगांव व बोहर्डीत साकळीच्या पदयात्रेचे जोरदार स्वागत : बोहर्डीत पदयात्रेकरूनी घेतला भोजनाचा स्वाद :


वरणगांव –
साकळी ते शेगांव पदयात्रा दिंडी सोहळा सोमवारी वरणगांव ते बोहर्डी मार्गे शेगांवला रवाना झाली . यावेळी पदयात्रेचे वरणगांव व बोहर्डी येथे जोरदार स्वागत करण्यात आले .
साकळी ( ता . यावल ) येथील जय श्री . गजानन महाराज फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी साकळी ते संत श्री . गजानन महाराज मंदिर शेगांव येथे पदयात्रा दिंडी काढली जाते . त्यामुळे या पदयात्रेचे सोमवारी (दि.२३ ) वरणगांव येथे आगमन झाल्यानंतर डॉ. नि . तु . पाटील यांनी फुलगाव जवळ पदयात्रेचे जोरदार स्वागत करून पदयात्रेत सहभागी भाविकांना चहा व नाश्ता दिला . यानंतर पदयात्रेतील संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमा असलेल्या आकर्षक रथाचे विजय वाघ ( पत्रकार) यांच्या प्रतिभा नगर मधील निवासस्थानी सपत्नी पुजा करण्यात आली . तसेच बोहर्डी येथील रोहीदास बेलदार यांच्या निवासस्थाना जवळ पदयात्रेकरुना स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडल्या नंतर पदयात्रा भक्ती भावाने शेगांवकडे मार्गस्थ झाली. यासाठी सर्व भाविक भक्तांनी मनोभावे सहकार्य केले .