भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच तर्फे २६ जानेवारी रोजी हिरकणी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे .
टिंबर मार्केट येथील
श्री लक्ष्मी वेंकटेश बालाजी मंदिराच्या हॉल मध्ये सकाळी १० ते ६ दरम्यान महोत्सव होणार आहे .
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच महिला उद्योजकतेला चालना मिळावी या भावनेतून महिला बचत गट ,तसेच महिला मंडळ महिला संस्थाच्या साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे जेणेकरून त्यांच्या उद्योगाला चालना मिळेल या ठिकाणी परिसरातील सर्व मैत्रिणींनी आपल्या मैत्रिणींस्ह सहभागी होवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे हिरकणी महिला मंचने आवाहन केलेले आहे त्याचबरोबर या महोत्सवामध्ये पारंपारिक वेशभूषा स्पर्धा तसेच गीत गायन स्पर्धा
स्टँड अप कॉमेडी कॉम्पिटिशन आणि महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टॉलचे विक्री व प्रदर्शन लावलेले आहे .
या महोत्सवाचे उद्घाटन जळगावच्या महापौर सौ जयश्री महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
आणि महिलांच्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या सौ दिपाली सुरवाडे , महिलांच्या उद्योजकांच्या योजनांविषयी आणि त्यांना उद्योग करताना येणार्या व अडचणींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला या महोत्सवामध्ये सौ कविता कोठारी
प्राध्यापिका शुभांगी राठी ,
डॉ मधु मानवतकर तसेच
डॉ सुवर्णा गाडेकर ,
काउन्सलर आरती चौधरी ,
जळगावच्या शहर व्यवस्थापक अभियान प्रमुख गायत्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहिल
तरी जास्तीत जास्त संख्येने महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे हिरकणी महिला मंचच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे यांनी आवाहन केले आहे



