भुसावळ – भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज 23 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरातील आर जी झांबरे महाविद्यालयांमध्ये ( भुसावळ स्कूलमध्ये ) भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला ही स्पर्धा दोन गटात ठेवण्यात आलेली होती पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते बारावी मोठा गट अशी विभागणी करण्यात आलेली होती लहान गटांमध्ये प्रथम पारितोषिक भूमिका किशोर असोदेकर सातवी द्वितीय पारितोषिक साक्षी अनिल हिवरकर तृतीय पारितोषिक मानसी मनोज साळुंखे यांनी मिळवले तसेच मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक भावेश विनोद आढळकर द्वितीय पारितोषिक अनिकेत विकास जोहरे तर तृतीय पारितोषिक वैष्णवी उल्हास भारंबे यांनी पटकावले या सर्व विजेत्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री समाधान महाजन सर रेल कामगार सेनेचे ललित कुमार मुथा तसेच भुसावळ स्कूलचे प्राचार्य कुमावत सर शहर प्रमुख दीपक धांडे शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद गायकवाड यांच्या हस्ते शिल्ड देऊन गौरवण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी आपले विचार मांडले तसेच कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कुमावत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षेचे परीक्षण बोरोले सर यांनी केले याप्रसंगी गायकवाड सर यांनी सुध्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील विचार मांडले कार्यक्रमाला शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र संघटक बबलू बराटे माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे,उप शहर प्रमुख,स्वप्नील सावळे ,शाखाप्रमुख पिंटू भोई, संदीप पाटील ,प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर, मनोज पवार ,लोकेश राणे, सिद्धेश जावळे, मोहित जंगले, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष गुरचड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती कविता पाटील मॅडम यांनी मानले



