वरणगावला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रम जल्लोषात : राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती :

वरणगाव – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बस स्टँड चौकात प्रतीमा पूजनासह अभिवादन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंदुहृदयस्राट मराठी मनाचे मानबिंदू शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रमाला सहकारमित्र चंद्रकांत बढे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष अश्फाक काझी, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सूभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख, उपशहरप्रमुख राम शेटे, सुखदेव धनगर, सुनील भोई, संजू कोळी, अशोक शर्मा, प्रवीण वाकोडे, नंदू खाराटे, संजू खराटे, सुरेश चौधरी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी जमील टेलर, माळी समाजाचे अध्यक्ष संजू माळी, युवक राष्ट्रवादी काँगेसचे वाय.आर.पाटील, प्रल्हाद माळी, महिंद्रा शर्मा, सतीश जैन, गोलू राणे, प्रतिभा तावडे, भाग्यश्री गायकवाड, योगिता सोनार, आबा सोनार, मोहसीन खान यांच्यासह वरणगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष यांच्याकडून प्रतीमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.

  • शिवभोजनवर खीरपुरीचे वाटप

हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज बस स्टँड चौकातील शिवभोजन केंद्रावर खीरपूरीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला वरणगाव शहरातील भारतीत जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राजकिय, सामाजिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, विवीध समाजाचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष तसेच पत्रकार बांधव उपस्थित होतें. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणानी परिसर दणाणून गेले होता.