भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवशीय स्नेहसंमेलनाचा जल्लोषात समारोप : हजारो विद्यार्थी थिरकले नृत्याचे तालावर .


भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि १८ व दि १९ रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा समारोप गुरुवारी संध्याकाळी झाला. ट्रामा सेंटरचे मेडिकल ऑफिसर डॉ.मयूर चौधरी,जवाहर नवोदय चे प्रिन्सिपल आर आर खंडारे, जळगांव केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल मैथ्यू अब्राहम,सिक्रेट हार्ट चर्च चे फादर आजो, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड ,प्रिन्सिपल निना कटलर यांनी व्दीपप्रज्वलन करुण उदघाटन केले.
स्नेहसंमेलनासाठी ताप्ती पब्लिक स्कूलचा परिसर पूर्ण उजाळून गेला होता, यावेळी शाळेच्या इमारती सजवण्यात आल्या होत्या विविध प्रकारचे बॅनर्स व फलक तसेच झेंडे लावण्यात आले होते हे स्नेहसम्मेलनाचे विशेष आकर्षक होतं. सेल्फी पॉइंट लावण्यात आला होता.
यावेळी प्रिन्सिपल नीना कटलर यांनी शाळेसंबंधी तसेच गुणवंत विद्याथ्र्यांबद्दल मनोगत केले व प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी १४८ विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.यात कर्नाटक येथे गेलेले इंटरनॅशनल जांभोरी चे विद्यार्थी तसेच दहावीत आलेले टॉपर विद्यार्थी, नॅशनल साठी स्पोर्ट लेव्हलसाठी गेलेले विद्यार्थी, ड्रॉइंग कॉम्पिटिशन व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या दोन हजार विद्यार्थांनी स्नेहसम्मेलन कार्यक्रमात विवीध नृत्य सादर केल्याने ताप्ती पब्लीक स्कुल चा परीसर दणाणला होता.
सर्वात प्रथम गणेश वंदना सादर करण्यात आली.
यावेळी विद्याथ्र्यांनी अनेकता मे एकता कन्सेप्ट,आजादी का अमृत महोत्सव ड्रामा, मनिकरनिका सॉंग, मल्हारी सॉंग,सुदामा कृष्ण मित्रता, युवा का महत्व,कोविड एक्ट, पंजाबी सॉंग,कोळी डान्स, लेझीम डाँस,गोंधळ अशा वेगवेगळ्या ४८ गाण्यांवर शाळेतील विद्यार्थांनी धम्माल केली. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रद्धाली घुले,सोफिया पी बॉडी,कय्यूम शेख,जतीन मोरे यांनी केले.तर आभार प्रिंसीपल निना कटलर यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वर्ग व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.