भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट आढळले असून या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. यावरून या प्रकरणाची शहानिशा करून पोलीस पथक साकेगाव येथे रवाना करण्यात आले . या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा पर्यंत साकेगावात सापळा रचला त्यात पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या व संशयीत आरोपी शन्नो या महिलेला ताब्यात घेतले
दरम्यान सदर महिलेने दिलेल्या जबाबा वरून पहूर येथील हनीफ पटेल वय ५५ याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी साकेगावातील अजून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात अनेक जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून अधिक चौकशी सुरू आहे.



