भुसावळ : आझाद हिंद एक्स्प्रेस मधून पश्चिम बंगालमधील रेल्वे प्रवाशाची 92 हजारांचा ऐवज असलेली बॅग जळगाव रेल्वे स्थानकावर चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पश्चिम बंगाल मधील मयुर महाल येथील रहिवासी प्रदीप उमाशंकर मेहरा हे 12139 डाऊन आझाद हिंद एक्स्प्रेस गाडीच्या बी-4 या डब्यातील 49 क्रमाकांच्या सीटवरून प्रवास करीत असतांना 24 डिसेंबर 2022 यादिवशी जळगाव रेल्वे स्थानकावर गाडी आली असता प्रवासी झोपल्याची संधी चोरट्याने साधत मेहरा यांची बॅग लांबविली. या बॅगेत 10 ग्रॅम सोन्याची चेन, लॉकेट, तीन हजार रूपये रोख, घड्याळ, मोबाईल, चष्मा असा एकुण 92 हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी मेहरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोपाळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. गुन्ह्याची कागदपत्रे ही बुधवारी रात्री भुसावळ लोहमार्ग पोलिसांना प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र चौधरी पुढील तपास करीत आहे.


