भुसावळात भोरगाव लेवा पंचायततर्फे 7 फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह : नाव नोंदणीचे आवाहन :

भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, शाखा भुसावळतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 7 फेब्रुवारी 2023 रोजी शहरातील संतोषी माता हॉलमध्ये करण्यात आले आहे. भुसावळ शाखेतर्फे हा सहावा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. ज्यांचे लग्न ठरलेले आहेत अशा जोडप्यांनी तसेच घटस्फोटीत, पुनर्विवाह इच्छुकांचे लग्न ठरलेले आहे अशा इच्छुकांनी 31 जानेवारीपर्यंत जामनेर रोडवरील भोरगाव लेवा पंचायत ऑफिसमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवदांम्पत्यास संसारोपयोगी वस्तू मिळणार
या सोहळ्यात वैदिक पद्धतीने विवाह होणार आहे. नवदांम्पत्यास संस्थेतर्फे गॅस शेगडी, सिलेंडर, मिक्सर, कुकर तसेच संसारोपयोगी साहित्य, ड्रेस, पैठणी आदी दिले जाणार आहे. समाजात होणारा लग्नाचा आर्थिक खर्च कमी व्हावा म्हणुन आणि नवीन निर्माण झालेल्या चुकीच्या पद्धतींना आळा घालण्यासाठी हा एक दिवसाचा विवाह सोहळा होणार आहे. तरी इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. यापूर्वी भोरगाव लेवा पंचायतीतर्फे पाच वेळेस सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. 7 फेब्रुवारीला सहाव्यांना सामुहिक विवाहाचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक सामुहिक विवाह सोहळ्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.