भुसावळ –
दुसखेडा रेल्वे स्टेशन येथे गार्ड डयुटीकामी असलेले आर.पी.एफ. कर्मचारी यांनी 2 अज्ञात चोरट्यांना दि.04.01.2023 रोजी रात्री 11.30 वा चे सुमारास
रेल्वेचे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना पकडण्याचा प्रयत्न केला होता.तेव्हा त्यातील एका अज्ञात चोरटयाने रेल्वेचे आर.पी.एफ. कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यामध्ये त्यांच्या डाव्या दंडास जखम झाली आहे. त्याबाबत फैजपूर पोलीस स्टेशन येथे गुरनं 02/2023 भादंवि कलम 353,333,379,511,34 प्रमाणे 2 अज्ञात चोरटयांविरुध्द दि. 05.01.2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आल आहे. नमुद गुन्हयाचे तपास करत असताना फैजपूर पोलीस स्टेशन व आर.पी.एफ. ची क्राईम ब्रांच यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दुसखेडा गावातील 2 संशयीत इसमांना तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यामुळे त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे
.एम. राजकुमार,पोलीस अधीक्षक, जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस स्टेशनकडील सपोनि आखेगावकर, पोउपनिरी लोखंडे, पोउपनिरी शेख, पोहेकॉ गुलबक्ष तडवी, पोना किरण चाटे, पोकॉ चेतन महाजन व त्यांच्या सोबत आर.पी.एफ क्राईम ब्रांच भुसावळ रेल्वेचे पोनि एल.के. सागर, पोउनि प्रविण मालविय, सफौ/ वसंत महाजन तसेच आर.पी.एफ. पोलीस स्टेशन भुसावळ चे पोनि गुर्जर यांनी गुन्हा उघडकिस आणण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनिरी मोहन लोखंडे व पोकॉ चेतन महाजन हे करीत आहेत.



