राम नाम जप उत्सवाचे भव्य शिबिर : राम नाम जप उत्सवाचे भव्य शिबिर. दोन लाख साठ हजार केले जप ;


भुसावळ.
श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ व रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांनी नुकतेच सोमवारी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच पर्यंत रामनाम उत्सवाचे भव्य शिबिर नवशक्ती आवारात
आयोजित केले होते. शिबिर मध्ये १५० पेक्षा जास्त सभासदांनी सहभाग नोंदवला होता.सुरुवातीस रामनाम जप,विश्वप्रार्थना व ब्रम्हचैतन्य परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन होऊन शिबिरास सुरुवात झाली. सचिव रागिणी पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. नंतर रामरक्षा, रामस्तुती,हनुमान चालीसा व मारुती स्तोत्र या स्तोत्रांचे सामुदायिक पठण झाले.त्यानंतर रामनाम जप प्रत्येकाने दीड तास मौन जप केला.शंभर पेक्षा जास्त सभासदांनी जप केला. एकूण जप दोन लाख साठ हजार इतका करण्यात आला.
प्राचार्य डॉक्टर जे पी सुचिक यांनी नामाचे महत्त्व यावर प्रवचन केले.
प्राचार्य डॉक्टर जे.पी. सूचिक,रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली अध्यक्ष नूतन फालक,सचिव मनिषा पाटील,हिरामण फालक,राधेश्याम लाहोटी,राजीव शर्मा,रश्मी शर्मा,अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे,मालती सोनवणे, दिनकर बेंडाळे,शकुंतला भंगाळे,लता बेंडाळे,गोपाल तिवारी,सुनंदा औंधकर, जयश्री ढाके,शशीप्रभा शर्मा, जी.आर.ठाकूर उपस्थित होते.