भुसावळ – गेल्या वीस वर्षापासून भुसावळ विद्युत केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेमुळे वेल्हाळे सह परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून त्यावर आजपर्यंत औष्णिक विद्युत केंद्र मार्फत कोणत्याही ठोस उपाय योजना होत असताना दिसून येत नाही सन 2009 पासून आदि जनता मच्छीमार सहकारी सोसायटी मार्फत तसेच संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समिती तसेच परिसरातील नागरिकांमार्फत होणाऱ्या प्रदूषणा च्या विरोधात वेळोवेळी आंदोलन केले असून आता त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच माझे महसूल मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार माननीय खडसे साहेब यांनीही लक्ष घातले असून मागील आठवड्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नवीन प्रकल्प 660 च्या मुख्य अभियंता यांनी होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली होती त्याच पार्श्वभूमीवर २×५०० मे व च्या प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांनी सुद्धा पाहणी केले या पार्श्वभूमीवर आज भुसावळ तालुका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरात होणाऱ्या प्रदूषणा बाबत कायमस्वरूपी उपाय योजना व प्रकल्पाच्या पाच किलोमीटरच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त व सुशिक्षित बेरोजगार यांना इतर प्रकल्पाप्रमाणे प्रकल्प बाधित म्हणून हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात सहकार्य करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या (उबाटा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, रावेर लोकसभा सह समन्वयक प्राध्यापक उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, माजी उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, राजेंद्र इंगळे यांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड साहेब यांचा शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी वरील पदाधिकारी उपस्थित होते .



