पनवेल – छपरा विशेष ट्रेनच्या कालावधीत वाढ


भुसावळ – प्रवाश्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल – छपरा विशेष ट्रेनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार :

05194 विशेष गाडी दि. १६.११.२०२२ रोजी २२.५० वाजता पनवेल येथून सुटेल आणि छपरा येथे तिसर्‍या दिवशी ०८.५० वाजता पोहोचेल.

05193 विशेष गाडी दि. १५.११.२०२२ रोजी १५.२० वाजता छपरा येथून निघेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी २१.०० वाजता पोहोचेल.

05194/05193 विशेष ट्रेनच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही