पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेन धावणार ;

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार:

05194 विशेष गाडी दि. 02.11.2022 रोजी पनवेल येथून 22.50 वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसर्‍या दिवशी 08.50 वाजता पोहोचेल.

05193 विशेष गाडी दि. 01.11.2022 रोजी छपरा येथून 15.20 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी 21.00 वाजता पोहोचेल.

थांबे कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर, बलिया,

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, 14 तृतीय वातानुकूलित, 3 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 जनरेटर व्हॅन.

आरक्षण: ट्रेन क्र.05194 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३०.१०.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.