मुंबई/पुणे आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन :

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई/पुणे आणि दानापूर दरम्यान 6 अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवणार आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार :

मुंबई-दानापूर अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल

01411 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल दि. 02/11/2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 11.55 वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी 17.00 वाजता पोहोचेल.

01412 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल दि. 03/11/2022 रोजी दानापूर येथून 19.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 23.50 वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

संरचना: दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह 18 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

पुणे – दानापूर अनारक्षित महोत्सव विशेष

01415 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल दि. 31.10.2022 आणि 03/11/2022 रोजी पुणे येथून सकाळी 00.10 वाजता निघेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पोहोचेल.

01416 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल दि. 01/11/2022 आणि 04/11/2022 रोजी दानापूर येथून 11.00 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 16.30 वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

संरचना: दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.