भुसावळ – भुसावळ शहरातील खडका रोड व गरुड प्लॉट भागातील भागातील अरफान मोहम्मद इम्तिहाज व विष्णू गोविंद कारगंजे हे मोटरसायकल घेऊन वरणगांवच्या दिशेने जाणारे मालवाहू डंफरला पाठीमागून धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, फिर्यादी मोहम्मद सलिम मेहमूद कासीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा वर असलेल्या मुन्ना तेली यांच्या भारत पेट्रोल पंपा समोर २४रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास यातील आरोपी यांनी त्याच्या ताब्यातील केटीएम मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ सी.टी.८५७२ ही वरणगांवच्या दिशेने जाणारे पाठीमागून डंपरला त्याच्या ताब्यातील गाडीचे नियंत्रण सुटून धडक देऊन स्वतःच्या व विष्णूच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोहेकॉ गणेश चौधरी करीत आहे.


