शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश राणे यांच्या उपस्थितीत भुसावळात शिवसेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन –

भुसावळ :शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश राणे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागात गुरुवार, 20 रोजी शिवसेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यात हंबर्डीकर चौकात सायंकाळी पाच वाजता, जुना सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ व मोहित नगरात सायंकाळी सहा वाजता शाखेचे उद्घाटन होईल.
अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन असतील. प्रसंगी शिवसेेेनने संपर्कप्रमुख सुरेश राणे, माजी आमदार दिलीप भोळे, उप जिल्हा प्रमुख उत्तमराव सुरवाडे, संतोष सोनवणे, निलेश महाजन, ललितकुमार मुथा, मुकेश गुंजाळ, प्रा.धीरज पाटील, बबलू बर्‍हाटे आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन शहरप्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबाईत, योगेश बागुल, जगू खेराडे, सोपान भोई, उमाकांत शर्मा आदींनी केले आहे.