भुसावळ : शहरातील बसस्थानक परीसरात आज विविध प्रकारच्या वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बसस्थानक परीसरातील जागेची स्वच्छता करून या जागेवर 17 वृक्ष लावण्यात आले. झाडांसाठी बाहेरून दोन ट्रॅक्टर माती नैसर्गिक खत देण्यात येऊन जगवण्याचे संकल्प पर्यावरण जागर प्रतिष्ठान व भुसावळ नगरपालिकेचे ब्रँड अॅम्बेसेडर नाना पाटील यांनी घेतला आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी ज्योती दीदी व दीपाली दीदी यांनीही वृक्षांसंदर्भात माहिती दिली. एस.टी.विभागाचे आगारप्रमुख प्रमोद चौधरी, मॅनेजर भोई, सुनील चौधरी, रेल्वे विभागातील पर्यावरणाचे प्रमुख अनंत झोपे, संदीप पाटील, देवदत्त मकासरे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, निसर्ग मित्र मंडळाचे प्रमुख संतोष मराठी, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सुरेंद्रसिंग पाटील, प्रशांत पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशांत नाना पाटील, किशोर नेवे, ठाकूर यांनी सहकार्य केले.



