नवीन पिढी जर शिकली तर आपण सर्व टिकू आणि आपण टिकलो तर देश वाचेल : आमदार संजय सावकारे –

भुसावळ : नवीन पिढी जर शिकली तर आपण सर्व टिकू आणि आपण टिकलो तर देश वाचेल, असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. शहरातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राबविलेले विधायक उपक्रम या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.एच. बर्‍हाटे होते.
समन्वयक अजय भोळे, विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील, सचिव प्रा.डॉ.जी.आर.वाणी, कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील, संचालक डॉ.गौरी पाटील, प्रा.स्वाती शेळके, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.डॉ.सचिन कोलते, प्रा.डॉ. उमेश फेगडे उपस्थित होते. समन्वयक अजय भोळे यांनी पंतप्रधानांनी राबवलेल्या विधायक उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक विद्यार्थी संघटनेचे माजी सचिव डॉ.जी.आर.वाणी तर सूत्रसंचालन अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील तसेच आभार कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील यांनी मानले.