ईद मिलादुन्नबी निमित्त दावते इस्लामी हिंद तर्फे फळ वाटप

. भुसावळ – पैगंबर मोहम्मद यांची जयंती निमित्त दावते इस्लामी हिंदची सामाजिक शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन GNRF द्वारा साकेगाव गोदावरी मेडिकल कॉलेज व दवाखाना येथे रुग्णांना फळं वाटप करण्यात आले यावेळी संस्थाचे जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी म्हणाले की संस्था मागील अनेक वर्षापासून असे सामाजिक कार्य करत आहे ते म्हणाले की पैगंबर मोहम्मद यांनी आपली सम्पूर्ण आयुष्य समाजाचे गरीब ,विधवा, व वंचित लोकांसाठी समर्पित केली होती आम्हीही त्या कार्याचा अवलोकन करण्याचं प्रयत्न करत आहे व भविष्य मध्येही असे सामाजिक कार्य संस्थाद्वारे होत राहील यावेळी त्यांच्यासोबत अजहर कादरी युसुफ खान अकील रजवी अकील कादरी व रफिक रोशन होते