साईश्वर मंडळ विविध उपक्रमांनी साजरा करणार नवरात्रोत्सव : कर्तृत्ववान महिलांचा दररोज सन्मान व त्यांचे हस्ते दुर्गेची आरती,आरोग्य शिबिरासह सेल्फी पॉईंट व विविध उपक्रम.


भुसावळ – येथील श्री साईश्वर नवदुर्गा मंडळ वर्ष दहावे यंदाचा नवरात्र उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सालाबाद प्रमाणे श्री साईश्वर नवदुर्गा मंडळ संतोषी माता हॉल समोरील रिंग रोड शेवटी स्थित असलेल्या या मंडळातर्फे उत्सव दुर्गेचा,, जागर स्त्रीशक्तीचा या उपक्रमांतर्गत यंदा विविध सामाजिक उपक्रम राबविन्यात येत आहे . यंदा नवरात्री उत्सवात दररोज विविध क्षेत्रातीलअगदी स्वछता कर्मचारी ते उच्च शिक्षित कार्यकर्तृत्ववान कृतिशील महिलांच्या हस्ते दररोज दुर्गा मातेची आरती करण्यात येणार असून सदर महिलांना श्री शक्ती सन्मान 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दिनांक 28/9/2022व मुलगा वयात येताना व दि 29 रोजी मुलगी वयात येताना विषयावर दुपारी 4 वाजता जळगाचे प्रा. दिलीप भारंबे यांचे व्याख्यान.
दिनांक 30/9/2022रोजी सायंकाळी सकाळी 6 वाजता योगशिबीर.
दुपारी 4 वा.आडवा अज्ञान, वाढवा विज्ञान या विषयावर
डॉ.कटारीया यांचे व्याख्यान.
संध्याकाळी 6 वाजता श्री अवधूत शिवानंद स्वामी यांचे अलौकिक तंत्रोक्त दुर्गा सप्तशती सामूहिक पाठ आयोजन.
दिनांक 1/10/2022रोजी
सकाळी 6वाजता योग शिबिर.
सायंकाळी 7.30 वा भुसावळ मधील प्रसिद्ध पिंकेथॉन गृप तर्फे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण.
दि.2/10/2022रोजी सकाळी 6वाजता योग शिबीर
सकाळी 9वाजता
गोदावरी मेडिकल महाविद्यालया तर्फे मोफत नेत्ररोग व थायरॉइड आरोग्य तपासणी शिबीर.
दि 5/10/2022रोजी
सकाळी 10वाजता विपश्यना ध्यान पद्धती मार्गदर्शन.
संध्याकाळी 8 वाजता हाउजि गेम चे आयोजन करण्यात आलेले असून दि 6/10/2022रोजी 4वाजता शेकडो महिलांच्या हस्ते सामूहिक महाआरती चे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच महिलांना नवदुर्गा उत्सवामध्ये मी रणरागिनी, मैं भारत की बेटी हू या संकल्पनेत आपला सेल्फी फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेला आहे. तरी सदर नवदुर्गा उत्सव मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री साईश्वर नवदुर्गा मंडळाच्या आयोजकांनी केले आहे.