भुसावळ : रेल्वे स्थानकावरून देशी आणि विदेशी मद्यासह तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी एका विक्रेत्यास रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे. असून स्टॉलवर देशी-विदेशी दारू जप्त केेली

भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर १/२ वर असलेल्या स्टॉलवर रेल्वे सुरक्षा बलाने शनिवार , २४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकून देशी-विदेशी दारू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.
रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर देशी विदेशी दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. यावरून लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर स्टॉलवर छापा टाकून देशी विदेशी दारू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. सदर स्टॉल एका महिलेच्या नावावर आहे
दरम्यान या कारवाईमध्ये १० देशी दारूच्या बॉटल , ८ विदेशी दारूच्या बॉटल, ४ सिगारेटचे पाकीट २ बिडीचे पाकीट व ४ गुटख्याचे पाकीट रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केल्याची माहिती सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.
घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने पंचनामा सुरू असून संबंधीत कार्यवाही सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे, कमर्शियल इनिस्पॅक्टर नितीन राठोड , कमर्शियल स्टेशन मॅनेजर मिलिंद साळुंखे, टीटीई धरणगावकर , हेल्थ इन्स्पेक्टर धर्मवीर, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. के. मीणा यांच्या पथकाने केली.


