भुसावळ – उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवतीर्थ मैदानाची परवानगी दिल्याने तालुक्यातील वरणगाव शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी बस स्टँड चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावाच्या सभेसाठी शिवतीर्थ मैदानाची शुक्रवारी7 परवानगी दिल्याने वरणगाव शहरात फटाक्यांच्या आतीषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. बस स्टँड चौकात सायंकाळी सात वाजता प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शिवसेना शहर प्रमुख संतोष माळी, अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, शहर समन्वयक विलास वंजारी, सुनिल देवघाटोळे, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, सुखदेव धनगर, सुनील भोई, संजू कोळी, शिवा भोई, बाळू माळी, निलेश काळे, उमाकांत झाभरे, प्रकाश कोळी, डॉ. सुनिल पाटील, विभागप्रमुख किरण माळी, प्रल्हाद माळी, भगवान माळी, वैभव फेगडे, गणेश पाटील, प्रवीण पाटील, आकाश कुरकुरे, शेख अब्दुल सत्तार, राहुल वंजारी, भुरा पाटील, विक्की मोरे, हेमंत तायडे, वैभव लोखंडे, आरीफ मन्यार, नितिन पाटील, राजु माळी, दिपक शेडके, कृष्णा पुजारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


