वेदांता-फॉक्सकॉनवरुन भुसावळ युवासेनेतर्फ निषेध स्वाक्षरी मोहीम : नाहाटा महाविद्यालय समोर खोके सरकार’ विरोधात जोरदार घोषणाबाजी:

भुसावळ – वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा ‘‘खोके सरकारच्या’’ बेजबाबदारपणामुळे गुजरात राज्यात गेला आहे. हा महाराष्ट्रासाठी अन्याय असल्याने याच्या निषेधार्थ शहरातील नाहाटा महाविद्यालयाचे प्रवेशद्वारासमोर युवासेनेतर्फे शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ गुरुवार, दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी निषेध करण्यात आला

वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा गुजरातला गेल्याच्या विरोधात राज्यभरात युवासेना रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्रातील 1 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा सुमारे 1 लाख 45 हजार कोटींचा हा प्रकल्प ‘‘खोके सरकारच्या’’ बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत खेदाची बाब असून महाराष्ट्रातील युवकांसोबत या ‘‘खोके सरकारची’’ धोकेबाजी आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात युवासेनेतर्फे निषेध स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे.

या मोहिमेप्रसंगी ‘‘खोके सरकारच्या’’ विरोधात जोरदार निदर्शने करुन घोषणा ही देण्यात आल्या. ज्यामध्ये ‘शिंदे-फडणवीस सरकारला साथ.. म्हणजे युवकांच्या रोजगारावर लाथ’, ‘स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’, ‘अलीबाबा आणि 40 चोर.. दिल्लीश्वरांसाठी लावताहेत जोर’, ‘रोजगार महाराष्ट्राच्या हक्काचा.. नाही तुमच्या बापाचा’, ‘सत्तेसाठी फिरलय मस्तक.. हे तर आहेत दिल्लीश्वरांचे हस्तक’ या घोषणांनी परिसर दणाणले होते.

‘‘प्रकल्प गेल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर होण्याची गरज आहे. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचे मोठे आवाहन आहे. त्यामुळे बेजबाबदारपणा करुन चालणार नाही. महाराष्ट्राला विकसित होण्यापासून पुढे जाण्यापासून थांबविले जात आहे. राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यावर असतांना दुसर्‍या राज्यात गेल्याने महाराष्ट्र राज्याचे तसेच राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे.‘’

या निषेध स्वाक्षरी मोहिमेला युवासेना जिल्हायुवाअधिकारि चंद्रकांत शर्मा शिवसेना शहरप्रमुख दीपकभाऊ धांडे शिवसेना नगरसेवक मुकेश भाऊ गुंजाळ तालुका युवाअधिकारी हेमंत ब-हाटे शहर युवाअधिकारी सुरज पाटील तालुका उप युवाअधिकारी बबलू धनगर तालुका उप युवाअधिकारी पवन बाक्से शहर शहर उप युवाअधिकारी शरीफ तडवी शहर उप युवाअधिकारी भूषण तायडे विभाग युवाअधिकारी धीरज सोनवणे विक्की चव्हाण भरत बाविस्कर यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.