भुसावळ – शहरातील साकरी फाट्या जवळील हॉटेल मधूबनच्या पाठीमागे एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयितस्थितीत मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, १४ सप्टेंबर रोजी सकाळी हॉटेल मधूवनच्या पाठीमागे एका अनोळखी महिलेचा मृतदेह परिसरातील नागरिकांना आढळला . त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनला या घटने बाबत माहिती दिली. त्यावरून घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे.
घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी व पोलिस कर्मचारी तपास करीत आहे . पोलीस सुत्रानीं सदर मृत महिलेचा खून असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून पोलिस अधिक तपास करीत आहे



