पोलिस व पालिका प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोसेवक परिवारासह विविध संघटना व शहरवासियांतर्फे सत्कार :


भुसावळ – गणेशोत्सव विसर्जना निमित्त चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस प्रशासन व शहरातील खड्डेमय रस्ते चांगले करुन नागरिकांना व गणेशोत्सव मंडळाना आंनदादायक दिलासा दिल्याबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक करून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देत येथील गोसेवा परिवार,शिववंदना परिवार
व गणेशोत्सोव मंडळातर्फे शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला .
गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे शहरातील खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत होते रस्ते चांगले करण्यात यावे असे निवेदन प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना गोसेवक परिवारातर्फे रोहित महाले व सहकारी यांनी दिले होते .
दरम्यान यांवृत्ताची त्वरित दखल घेवून प्रशासकीय स्तरावर प्रांत यांनी आदेश दिले त्यानुसार नगरपालीकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व त्यांच्या सहकारी टीमने रस्त्याच्या कामाला सुरुवात करून शहरातील सर्व रस्ते उत्कृष्ट केले यामुळे गणेशोत्सोव दरम्यान पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड़ , यांचेसह सर्व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला म्हणून विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही उत्तम व उत्कृष्ठ व्यवस्थेमुळे बाप्पाला सुखरूप निरोप देण्यात आला त्याबद्दल मुख्याधिकारी व पोलीस दलाचे व सर्व टीमचे गोसेवा परिवार,शिववंदना परिवार
व गणेशोत्सोव मंडळाकडुन
सन्मान करण्यात आला
यावेळी मुख्याधिकारी यांनी मनावर घेतले तर भुसावळचा विकासात भरीव सहकार्य मिळेल मनोगत रोहित महाले व विवेक खटोड यांनी मांडले .
शहरातील सर्वच रस्ते उत्कृष्ट केली तसेच शहरातील रस्ते शहराचा विकास झाला आणी गणेत्सोव विसर्जनावेळी उत्कृष्ठ व्यवस्था केली त्याबद्दल
पोलीस विभागातील सर्व अधिकारी व सर्व पोलिस कर्मचारी टीम , अजुर्ना टीम , वन्यजीव संस्था , बचाव पथक ,विर्सजन टीम ,पर्यावरण बचाव टीम,यांचेसह भुसावळकरांनी आभार व्यक्त केले आहे . पर्यावरण संस्थेचे नाना पाटील सराचे पण आभार मानले पालिका प्रशासनाचे व पोलिस प्रशासनाने ठेवलेल्या बंदोबस्तामुळे श्री गणेश विसर्जन शांततेत व आनंदात झाले आम्ही सर्व सुखरुप आहोत असे मनोगत सौ शारदाताई खटोड यांनी यावेळी व्यक्त केले.

 सौ शारदा खटोड , गोसेवक रोहित महाले, विवेक खटोड,  संजय खटोड ,प्रशांत वानखेडे, रितेश वानखेडे,  व समस्त बांधव यांनी सुद्धा  सर्वाचे आभार मानले .