प्रशिक्षणा अभावी हजारो शिक्षकांची वरीष्ठ निवड श्रेणी रखडली! हमी पत्र ग्राह्य धरा . प्र. ह. दलाल यांचे शासनाला निवेदन :

भुसावळ – राज्यात माध्यमिक शिक्षकांना एकाच संवर्गात सलग बारा वर्ष सेवा झाल्या नंतर वरीष्ठ व चोवीस वर्षा नंतर निवड वेतनश्रेणी देण्यात येते मात्र त्यासाठी शिक्षकांनी शासनाने आयोजित केलेले सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. किँवा प्रशिक्षण पूर्ण करून देण्याबाबत हमी पत्र लिहून द्यावे असा शासनाचा च आदेश आहे . काही वर्षांपूर्वी हे प्रशिक्षण दरवर्षी मे च्या शेवटी किँवा जूनच्या पहिल्या आठवड्यात नियमित पने आयोजित होत असे. मात्र कुठे माशी शिंकली न कळे गेल्या सात वर्षांपासून हे प्रशिक्षण शासनाने आयोजितच केले नाही. त्यामुळे असंख्य शिक्षकांना वरीष्ठ/निवड श्रेणी पासून वंचित रहावे लागले दरम्यान अनेक सेवानिवृत्त ही झालेत . अनेक समस्या निर्माण झाल्यात .शिक्षकांनी आमचे प्रशिक्षण घ्या म्हणून आंदोलनही केले.अखेर झोपलेले शासन भानावर आले आणि गेल्या वर्षी ऑन लाईन प्रशिक्षण घोषित करण्यात आले मात्र विनामूल्य असलेल्या प्रशिक्षण प्रत्येकी दोन हजार रु.फी आकारून लाखो रु ची कमाई करून घेतली . ऑन लाईन प्रशिक्षण अनेक समस्यांनी शिक्षकांना प्रचंड डोके दुखी ठरली तरी झाले एकदाचे प्रशिक्षण म्हणून आनंदही व्यक्त केला . पण शिक्षकांना सुखाने जगू न देण्याचा वीडाच जणू शासनाने उचलला आहे. आता एक जानेवारी २०२२पासून नऊ महिने झाले प्रशिक्षणही नाहीं आणि हमी पत्र स्वीकारून वेतन श्रेणी देणे ही बंद करून टाकले .त्यामुळे पुन्हा राज्यात हजारो शिक्षक वरीष्ठ/निवड श्रेणी पासून वंचित राहिले आहेत. प्रशिक्षण कधी घेणार ह्या बाबत शासन नेहमीप्रमाणे मूग गिळून बसले आहे.आणि हमी पत्र का नाहीं स्वीकारत त्याचेही उत्तर नाही. शासनाच्या ह्या उदासीन वृत्तीने शिक्षक मात्र हवालदिल झाले आहेत शासन प्रशिक्षण घेत नाही अन् अधिकारी हमी पत्र स्वीकारीत नाही अश्या विचित्र कात्रीत शिक्षक सापडले आहेत. हमी पत्र स्वीकारून वेतन श्रेणी देण्याचा शासनाचा च आदेश शासनच मान्य करीत नसल्याने शिक्षकांनी आता दाद तरी कोणाकडे मागावी अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे तेव्हा हमी पत्र स्वीकारून शिक्षकांना त्यांच्या हक्काची वरीष्ठ /निवड श्रेणी देऊन त्यांचा आर्थिक छळ करू नये व त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये अशी मागणी ज्येष्ठ शिक्षक नेते प्र. ह.दलाल यांनी केली आहे