भुसावळ – तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथील नवीन पाण्याच्या टाकीचे मान्यवरांच्या हस्ते नारळ वाहून तथा कुदळ मारून कार्यारंभ झाला
यावेळी भारतीय जनता पार्टीचे भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, सुरेश दादा पाटील सरपंच योगिता सोनवणे, उपसरपंच आनंद ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे , अनिल सोनवाल , पप्पू राजपूत , हिंमत सोनवणे , समाधान कोळी, सागर सोनवाल , अशोक सपकाळे ,गजानन पवार , विष्णू सोनवणे , किशोर सोनवणे सह मान्यवरांची उपस्थिती होती गावातील जुन्या टाकीच्या शेजारीच नवीन टाकीचे बांधकामास सुरुवात करण्यात आलेली असून पुढील आठवड्यात गावातील नवीन पाईपलाईनला सुरुवात होईल योजना अवघ्या सहा महिन्यात पूर्णत्वास येईल व समस्त ग्रामस्थांच्या प्रत्येक घराला कनेक्शन देण्यात येईल या योजनेसाठी ग्रामपंचायत प्रशासनासह आमदार संजय सावकारे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठामंत्री नामदार गुलाबराव पाटील खासदार रक्षा खडसे तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेली हर घर जल हर घर नल अशा जल जीवन मिशन अंतर्गत सर्वांच्या सहकाऱ्याने गावात नवीन पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन ज्यामुळे पुढील शंभर वर्ष ग्रामस्थांना पाण्याची अडचण भासणार नाही अशा पद्धतीने पाणीपुरवठा योजना गावात कार्यान्वित होणार आहे यामुळे निश्चितच सर्वांना ही आनंदाची बाब असून या योजनेसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सरपंच यांनी सांगीतले.



