फुलगावमधील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश : शिवसेना झिंदाबादच्या घोषणानी परिसर दणाणला :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील असंख्य युवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शनिवारी सायंकाळी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचारानी प्रेरित होवून तसेच जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे . यावेळी विलास मुळे, तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश सोहळा झाला.

छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा संघटक, विलास मुळे, अल्पसंख्याक संघटक सईद मुल्लाजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी असंख्य युवकांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार धारेला मानून आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी हा प्रवेश केला आहे.
उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, वरणगावचे माजी ग्रा. पं. सदस्य विलास वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संघटनेला साथ देण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला त्यासाठी मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो. फुलगावमधील बेरोजगार तरुणांना दीपनगरमध्ये नोकरीला लावले आहे. आणि येणाऱ्या काळात देखील फुलगावमधील प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पबाधित तरुणांना दीपनगरमध्ये नोकरी देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

राजेश महाजन (खन्ना), मनोज जाधव, मनोज कोलते, रोशन सय्यद, सुभाष शिंदे, शेखर बाविस्कर, जगदीश वराडे यांनी कार्यक्रम घडवून आणला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी केले.

  • शिवसेनेत यांनी केला प्रवेश

लखन कोळी, शंकर कोळी, राहुल वराडे, विठ्ठल कोळी, गणेश पाटील, शशिकांत चौधरी, राजु चौधरी, छोटू शिंदे, संजय चौधरी, संजय कोळी, भूषण पाटील, अमर पाटील यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.