भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांना राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट संचालक/प्राचार्य ह्या श्रेणीतील मानाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे Universal Mentor’s Association तर्फे प्रदान करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाची सलग कारकीर्द असण्याच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
अभ्यास, सराव व संधी ही त्रीसूत्री अवलंबून प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी मागील दोन दशकांदरम्यान महाविद्यालायत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (आधीचे : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अश्या विविध शैक्षणिक ठिकाणी जबाबदारीच्या पदांवर काम करतांना विद्यार्थी आणि शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवत मोलाची कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर का खिताब प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांना देण्यात आला.
सांस्कृतिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या म्हणाल तर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या वैज्ञानिक तत्वांची रुजवणूक व्हावी म्हणून तांत्रिक निबंध स्पर्धा, राष्ट्रीय यंत्रामानव स्पर्धा, सामाजिक करणांशी संबंधित प्रकल्पांची उभारणी , कृषि आणि औद्योगिक पातळीवर सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तयार केले प्रकल्प, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात AICTE च्या राष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तयार केलेला प्रोजेक्ट, , अनेक औद्योगिक अडचणी तसेच नवीन वस्तु/उत्पादने महाविद्यालयातून प्रोजेक्टच्या माध्यमातून सोडवणे, सोडवल्या ,महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतःचे स्टार्टअप्स सुरू करून रोजगार निर्मिती तसेच औद्योगिक वाढीला सुद्धा हातभार लावणे, आंतर्राष्ट्रीय उद्योगांमध्ये नौकरीच्या संधी, परदेशातील स्पर्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात AICTE च्या राष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेचे मानांकन, उद्योग उभारणी आणि त्या साठीचे मार्गदर्शन ह्या सगळ्या बाबींमधील सहभाग आणि मार्गदर्शन ह्याचे मूल्यमापन करून डॉ. राहुल बारजिभे राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट संचालक/प्राचार्य ह्या श्रेणीतील मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी राष्ट्रीयच नाही तर आंतर्राष्ट्रीय उद्योगांमध्ये उच्च पदांवर रुजू झाले आहेत. आजच्या घडीला महाविद्यालयातील १७० हून विद्यार्थी-विद्यार्थिनीना ह्या शैक्षणिक वर्षदरम्यान placement देण्यात महाविद्यालय यशस्वी झाले आहे. ह्या असामान्य कामगिरीची नोंद घेत महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राममोहन अग्रवाल यांना सुद्धा उत्कृष्ट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर असा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. राहुल बारजिभे यांना मिळालेला हा पुरस्कार सात दशकांहूनही अधिकचा शैक्षणिक वारसा लाभलेल्या भुसावळातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था अर्थात हिन्दी सेवा मंडळासाठीच नाही तर एकूणच अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रासाठी मानाची बाब आहे अशी भावना हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड, यांनी व्यक्त केली.
सत्कार समारंभाला डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ..ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील,प्रा. डि. जी. अग्रवाल यांची सुद्धा उपस्थिती होती.



