महिला क्रिडा मंडळातर्फे भुसावळात प्रथमच रंगल्या खुल्या बुध्दीबळ स्पर्धा ; विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग :


भुसावळ- येथील महिला क्रिडा मंडळातर्फे भुसावळ शहरात नुकत्याच प्रथमच खुल्या बुध्दीबळ स्पर्धाचे घेण्यात आल्या . सदर स्पर्धस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तसेच आयोजकांचे शहरवासिय व खेळाडू यांनी मनस्वी धन्यवाद मानले .

संतोषीमाता सभागृहात स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सतीश कुलकर्णी व डॉ. नारायण आर्वीकर मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी व सचिव लता होसकोटे आदी मान्यवर उपस्थित होते
सकाळी 10. 30 वाजता सुरु झालेल्या या स्पर्धेत एकुण 135 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .यात बुलढाणा, अकोला, पाचोरा, अमळनेर, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठीकाणाहून स्पर्धक आले होते.
दिवसभरात एकूण सात राउंड घेऊन स्पर्धा संपन्न झाल्या.
संध्याकाळी बक्षिस समारंभ झाला या प्रसंगी प्रमुख पाहूणे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे, डाॅ. सुवर्णा गाडेकर , सौ रजनी सावकारे
अध्यक्षा आरती चौधरी ,
व सचिव लता होसकोटे, व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रसंगी प्रास्ताविकात आरती चौधरी यांनी भुसावळ मधील क्रिडा क्षेत्रात महिला क्रिडा मंडळाने हा बहुमान संपादित केला व खुल्या बुध्दीबळाच्या स्पर्धा भुसावळात प्रथम महिला क्रिडा मंडळाने घेतल्या असल्याचे सांगून संस्था परिचय दिला.
सुत्रसंचलन राजश्री कात्यायनी व जयश्री ओक यांनी केले
वैशाली भगत यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी प्राची राणे, लता ढाके. स्वाती भोळे , अनिता कवडीवाले, किरण चौधरी, भारती चौहान, रश्मी ठोसर, संजीवनी पिंगळे, माधुरी गव्हाळे, वीणा ठाकूर, मंगला पाटील, श्रध्दा सराफ, प्रा. माधुरी पाटील, किरण शुक्ला
प्रा. माधुरी गुजर
संगिता मुजुमदार
हजर होत्या. तर बक्षिस समारंभाला
रोटरी क्लबचे अध्यक्ष शुक्ला, ठाकूर सर अनंत पाटील, डॉ. विकास कोळंबे.,डॉ. वर्षां कोळंबे इनरव्हील अध्यक्षा रुचिका शर्मा, इनरव्हील रेल सिटी च्या अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, वर्ल्ड स्कूलच्या जयश्री कोलते, डॉ. वंदना वाघचौरे, डॉ. माया आर्वीकर, प्रवीण पाटील सर , यांचेसह मान्यवर हजर होते
सात वर्षाखालील गट
1) गौरव बोरसे
2)राजूल सरोदे
3)कुबेर पाटील
नऊ वर्षाखालील गट
1) अर्णव मंडोले
2)गोरक्षण चौधरी
3)हीतार्थ झांबरे
बारा वर्षा खालील गट
1)आमले अराध्या
2)ईशान्त गट्टे
3)सुमीत चींचोले.
पंधरा वर्षे खालील गट
1)देवांश गवांडे
2) संस्कार पवार
3)तांबट यश
सिनीयर सिटिझन 60 पेक्षा जास्त गट
1)डाॅ. नारायण आर्वीकर (डीन.. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज)
2)निवृत्ती इंगळे
3)विलास कोलावाले
ओपन ग्रुप
चेस चॅम्पियन..अजय परदेशी
2)प्रविण हेंड
3)मितेश जेठवा
4)हृषीकेश सोनार
5) रोहीत पाटील
6)मंथन निमोनकर
7)राहूल केसवालेकर
8)दयानंद शेंडे
9)कुशल अकोले
10)हितेश पाटील
भुसावळल चेस क्वीन-पुर्ती पाटील
भुसावल चेस कींग-अरबाझ शेख