भुसावळ :- ( प्रतिनिधी )
” देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे , या वैभवशाली शहरात हा अनोखा कार्यक्रम होत असून सर्वांमध्ये सौहार्दाचे वातावरण दिसत आहे ,अशीच एकात्मता कायम टिकवून ठेवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे ” प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मोहन तायडे हे होते. उदघाटन पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी तसेच उद्योजक विकास पाचपांडे ,जिल्हा सचिव व कलावंत तुषार वाघुळदे, जेष्ठ कलावंत मोहन तायडे,मकरंद चांदवडकर ,दीपक नाटेकर आदी उपस्थित होते.
ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे सचिव व कलावंत तुषार वाघुळदे म्हणाले ,” देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान देणा-या स्वातंत्र्यवीरांची देशभक्ती, त्याग आणि समर्पण कार्याचा जागर करण्यासाठी तसेच देशवासीयांच्या मनात देशभक्तीची दिव्य ज्योत तेवत ठेवण्यासाठी, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, यासाठी हा स्फूर्तीदायक कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आजही अनेक देशात भारतासारखे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात नाही. त्यामुळे भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा वारसा, इतिहास व त्यासाठी अनेकांनी केलेले बलिदान, त्याग विद्यार्थ्यांना ,लोकांना ज्ञात असणं ही काळाची गरज आहे,असेही ते पुढे म्हणाले..या प्रसंगी विजय कोसोदे
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक लालचंद चौधरी , विलास रामदास पाटील , एकनाथ कपले,मनोज कपले ,वैभव श्रीराम पाटील ,भानुदास गेंदालाल गुजर , शरद वासुदेव पाटील , प्रकाश नामदेव पाटील , संतोष सीताराम पाटील ,चंपालाल आनंदराव पाटील , रवींद्र चौधरी , पितांबर पाटील , अनिल अरुण कुळकर्णी , डी.डी.मोंढाळे ,दिलीप मार्तंड पाटील , विजय वानखेडे,संतोष
अट्रावलकर ,सुधाकर कोळी,मधुकर डोळे ,प्रकाश लोखंडे यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
माजी पोलीस कर्मचारी अशोक जवरे तसेच पोलीस कलावंत संघपाल तायडे ,संदीप बडगे यांचाही सत्कार करण्यात आला..
भुसावळ पोलीस दल ,रोटरी क्लब रेलसिटी ,मातृभूमी मंडळ ,श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदींच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल शाळेच्या पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अत्यंत देखणा,स्फूर्तीदयक आणि बहारदार असा हा देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम चांगलाच रंगला.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे ,डॉ.शंतनू कुमार साहू ,नगरसेवक किरण कोलते, पंकज महादेव , रोटरीचे मकरंद चांदवडकर ,ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन तायडे, जिल्हा सचिव व कलावंत ,पत्रकार तुषार वाघुळदे ,उपाध्यक्ष व जेष्ठ गायक मोहन गारुंगे, उद्योजक विकास पाचपांडे ,पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य आनंद शहा , माजी नगरसेवक देवा वाणी ,किरण कोलते आदींची विशेष उपस्थिती होती. उपस्थितांमध्ये असोसिएशनचे सदस्य कपिल घुगे,जेष्ठ कलावंत विजय कोसोदे , खाकी वर्दीतील गायक संघपाल तायडे आदी होते.

भुसावळ शहर व तालुक्यातील शेकडो रसिक-श्रोत्यांनी या देशभक्तीपर कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीत्साठी भुसावळ तालुका ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक नाटेकर प्रवीण ओहोळ,विवेक शिवरामे,अनिल तायडे,दिनेश ठाकूर, पिंकी मास्टर,दिलीप इंगळे,जय सोनवणे,साई चव्हाण,संजीव पटेल,अविनाश ठाकूर,मनीष चापरे आदी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात कलावंत लक्ष्मी नाटेकर,विकास जंजाळे ,गायत्री नाटेकर ,संघपाल तायडे , संजय सुरवाडे,अनिल भालेराव, रजनी भारसके, चंद्रकांत पाटील,जगदिश बिंद्रा ,खुशी वाघमारे यांनी देशभक्तीपर गाणी गायिली ,आणि रसिक-श्रीत्यांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश लोडते आणि परवेश शेख यांनी केले तर आभार लक्ष्मी नाटेकर यांनी मानले.


