भुसावळ- येथील लक्ष्मी नगरात सामाजिक कार्यकर्त्या दिपाली गणू वाणी (बऱ्हाटे) यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या 75 व्या निमित्त 15 ऑगस्ट रोजी 300 ते 400 वयोवृद्ध महिला व पुरुषांचे नेत्र तपासणी करण्यात आली,या नेत्र तपासणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
लक्ष्मी नगर हा एरिया भुसावळ शहरापासून लांब आहे वृद्ध नागरिकांना ये जा होत नाही त्यात या भागातील काही वयोवृद्धांना डोळ्यांचा त्रास होत होता , दवाखाने लांब असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या दीपा वाणी बऱ्हाटे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या शिबिराचे आयोजन केले .
या शिबिरात नेत्रम हॉस्पीटलचे तज्ञ डॉक्टर सुनिल मेश्राम यांनी वयोवृद्धांच्या डोळ्यांची तपासणी केली. यावेळी दीपा वाणी यांच्या सह ज्योती महाजन, गिता नारखेडे,शोभा झारखंडे,वंदना सोनार,छाया हेंडे, हर्षाली पाटील,शशीकला झांबरे,बबिता ढोले, सुवर्णा चौधरी,उज्वला पाटील,सुनिता वाणी, सविता सुरवाडे,वृषाली राणे,मनिषा नारखेडे आदी महिला वर्ग उपस्थित होते.



