भुसावळच्या महिलांची संपूर्ण शहरात दुचाकी एकता रॅली ; स्वातंत्र दिन उत्साहात साजरा ;


भुसावळ – भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी भुसावळच्या विविध महिला संघटनांच्या महिलांनी संपूर्ण शहरात दुचाकी रॅली काढून स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. रॅलीमध्ये जैन महिला मंडळाच्या सारिका विकास जैन व अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा बेहरा, सचिव नीलम जैन यांनी परिश्रम घेऊन सर्व महिलांना एकत्र केले.
या रॅलीला प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी पाठिंबा दिला.
पिंकाथॉनच्या संस्थापक माधुरी गुजर यांच्यासह इनव्हील ब्लॉसम, जेसीआय क्लब, भुसावळच्या पतंजली ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला,
या ऐतिहासिक रॅलीमध्ये संजय सावकारे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला,
आणि रॅलीत देशभक्तीपर गीते वाजत राहावीत यासाठी मनीष मॉलचे दिलीपकुमार रमेशलाल जमनानी यांनी प्रायोजित साउंड सिस्टीम आणि रिक्षा साठी सहकार्य केले,
रजनी सावकारे, प्रा.माधुरी गुर्जर, सारिका जैन,हेमा बेहेरा,नीलम जैन, ऋतिका हेडा,ज्योती दरगड,निशा मंडलेचा,उषा जैन, हर्षा जैन,वीणा जैन, कामिनी जैन, सजन टाक, दिपा पटेल , कल्पना मंडोरे, अनिता आंबेकर, शोभा रांजणे, वैशाली सैत, सैतवाल,निकिता खुशलानी यांच्यासह महिलांची उपस्थिती होती, रॅलीला अष्टभुजा मंदिरापासून सुरुवात करून,तेथून बाजार पेठ पोलिस स्टेशन, गांधी पुतळा,सरदार वल्लभभाई पुतळा, मामाजी टॉकीज, जामनेर रोड मार्गे व्यंकटेश मंदिर, नाहाटा कॉलेज जवळ समारोप झाला.नाहाटा चौफुली येथील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारका जवळ समारोप करण्यात आला.