भुसावळ – तुम्हाला वाटेल हा फोटो आहे, पण हा फोटो नसून हायपर रिअॅलिस्टिक रांगोळीचे पोर्ट्रेट आहे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याच्या ताप्ती पब्लिक स्कूलच्या चित्रकलेच्या शिक्षिका रचना महाजन यांनी रात्रंदिवस सलग 30 तास खर्च करून ही अविश्वसनीय, अद्भूत, अनोखी, क्षणभर थक्क करणारी उच्च वास्तववादी पोर्ट्रेट ही कलाकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे खरच रांगोळी ही सुद्धा कला कौशल्य आहे, याकरीता
एकूण ३० तास वेळ लागला असून रांगोळी एकूण 130 चौरस फूट (13 x 10 फूट) आकारांत साकारली आहे .
ताप्ती पब्लिक स्कूल महेश फालक,कल्पना फालक,निना कटलर.शहरवासियासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून कलाकृती बद्दल रचना महाजन यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन होत आहे .



